करमाळ्यात श्रीराम जन्मोत्सवाचा अभूतपूर्व सोहळा – अयोध्येतील प्रभू श्रीरामांची हुबेहूब मूर्ती ठरणार मुख्य आकर्षण

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- सकल हिंदू समाज, करमाळा शहर व तालुक्याच्या वतीने शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी आयोजित श्रीराम जन्मोत्सव मिरवणूक यंदा ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत. या मिरवणुकीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे साक्षात अयोध्या नगरीतील प्रभू श्रीरामांची हुबेहूब मूर्ती करमाळ्यात आणण्यात आली आहे. यामुळे अयोध्याच जणू करमाळ्यात अवतरली असल्याची प्रचिती करमाळावासियांना येणार आहे.
मागील वर्षीप्रमाणेच यंदाही या सोहळ्यासाठी बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत. तोच उत्साह यंदाही कायम असून कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.


या भव्य दिव्य मिरवणुकीत महिलांचा सहभाग हे विशेष आकर्षण असेल. ढोल-ताशा पथकांमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या असून, करमाळा शहरातील जास्तीत जास्त भगिनींनी या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मिरवणुकीची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे.मिरवणूक ही आज सायंकाळी ४:०० वाजता किल्ला वेस, करमाळा येथून प्रारंभ होणार आहे. तसेच सदर मिरवणूकीत  ब्रह्मांड ढोल ताशा व ध्वज पथक असून यावेळी वीर शिवाजी मर्दानी खेळ करमाळा यांचे शिवकालीन चित्त थरारक प्रात्यक्षिके होणार आहेत. त्याचप्रमाणे  श्री संत हरी हरी बाबा वारकरी शिक्षण संस्था कोर्टी येथील विद्यार्थी टाळ मृदुंगाच्या गजरात सहभागी होणार असून  करमाळ्यातील सर्व हलगी ग्रुपचाही मोठा सहभाग असणार आहे. मिरवणूकीमध्ये आकर्षक डेकोरेशन आणि ‘एस.के. एलईडी स्क्रीन्स’ (SK Led Screen) द्वारे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकल हिंदू समाजातर्फे सर्व रामभक्तांना या भव्य सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!