सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी विक्की जाधव मित्रपरिवाराचा भंडारा; हजारोंनी घेतला महाप्रसाद.
अमळनेर : विकी जाधव.
चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गड येथे पायी जाणाऱ्या भाविकांसाठी अमळनेर येथील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर विक्की जाधव मित्रपरिवार, रामदेवजी बाबा मित्र मंडळ व गौरी गणपती मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले.

या भंडाऱ्यात गडावर जाणाऱ्या असंख्य भाविक भक्तांसाठी पावभाजी, साबुदाणा खिचडी व चहापाणीची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर भाविकांची मोठी गर्दी उसळली असून हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या सेवाभावी उपक्रमात विक्की आबा जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनापासून परिश्रम घेतले.
विशेष म्हणजे, गडावर पायी जाणाऱ्या महिलांसाठी यांच्या कडून हिरवा चुडा (बांगड्या) भरून देण्याचा कार्यक्रमही करण्यात आला, ज्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला. या अनोख्या उपक्रमामुळे भंडाऱ्याला वेगळेच सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले.

हिरवा चुडा (बांगड्या) भरून देताना सेवेकरी
यावेळी बोलताना विकी जाधव यांनी सांगितले की, “सर्व काही करून घेणारी आदिशक्ती माऊलीच आहे, आपण फक्त माध्यम आहोत.” अनेक वर्षांपासून सातत्याने हा भंडारा आयोजित केला जात असून त्यामागे सप्तशृंगी मातेची कृपा, मित्रपरिवाराची साथ आणि समाजाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले.