“रुग्ण हक्क परिषदेच्या शिबिरात पद्मश्री भिकल्या धिंडा; ‘पृथ्वी मोबाईल क्लिनिक’ची सेवा ठरली उपयुक्त”

अपनी भाषा में पढ़े! Translate

“रुग्ण हक्क परिषदेच्या शिबिरात पद्मश्री भिकल्या धिंडा; ‘पृथ्वी मोबाईल क्लिनिक’ची सेवा ठरली उपयुक्त”

पुणे/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

रुग्ण हक्क परिषदेतर्फे आयोजित दैनंदिन आरोग्य शिबिरांच्या मालिकेतील १५५वे शिबिर आज पुण्यातील गणेश पेठ परिसरात पार पडले. या शिबिराला पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांची विशेष उपस्थिती लाभली.

गणेश पेठ परिसरात खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या भिकल्या धिंडा यांना अचानक चक्कर, उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांनी रुग्ण हक्क परिषदेच्या ‘पृथ्वी मोबाईल क्लिनिक’मध्ये भेट देत तात्काळ वैद्यकीय तपासणी करून घेतली. डॉ. अनिकेत मडावी, परिचारिका वृषाली कानसकर आणि शिबिर सहाय्यक मल्लेश कांबळे यांनी त्यांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले.

उपचारानंतर समाधान व्यक्त करताना भिकल्या धिंडा म्हणाले, “रुग्ण हक्क परिषदेच्या या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या दारातच उपचार मिळत आहेत. मला तात्काळ आणि योग्य उपचार मिळाले, याबद्दल मी आभारी आहे. अशा शिबिरांमुळे गरजू लोकांना मोठा आधार मिळतो.”

यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सांगितले की, रुग्ण हक्क परिषद आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, मंत्रालय मुंबई यांच्या समन्वयातून पुणे शहरातील विविध भागांत दररोज आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना केवळ ५ रुपयांत सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठ्ये, समन्वयक राजाभाऊ कदम, अमित जागडे, मुख्यमंत्री सहायता निधी पुणे जिल्हा कक्ष अधिकारी डॉ. मानसिंग साबळे तसेच पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!