वडिलांची अपूर्ण इच्छा मुलाने अशा प्रकारे पूर्ण केली; ४५ महिलांना घडवले सप्तशृंगी देवीचे दर्शन

अपनी भाषा में पढ़े! Translate

वडिलांची अपूर्ण इच्छा मुलाने अशा प्रकारे पूर्ण केली; ४५ महिलांना घडवले सप्तशृंगी देवीचे दर्शन

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यातील गंगापुरी येथील एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. भीमराव किसन रामोसे (वय ७९) यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे ते अंथरुणाला खिळले होते व मृत्यूशी झुंज देत होते. अखेरच्या दिवसांत त्यांनी मुलगा पत्रकार तथा शिक्षक महेंद्र रामोसे यांच्याकडे साप्तश्रुंगी गड येथे जाऊन देवीचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मुलानेही वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार केला होता, मात्र शाळेच्या कामातून वेळ काढून सुट्टीच्या दिवशी नेण्याचे ठरले असतानाच त्यापूर्वीच वडिलांचे निधन झाले आणि त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.

वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो नाही याची खंत महेंद्र रामोसे यांच्या मनाला सतत बोचत होती. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एक वेगळाच निर्णय घेतला. वडिलांना गडावर नेऊ शकलो नाही, पण त्यांच्या नावाने काहीतरी सत्कर्म करावे या भावनेतून त्यांनी आपल्या आईसोबत गावातील ४५ महिलांना स्वखर्चाने सप्तशृंगी गडावर नेऊन देवीचे दर्शन घडवले.

महेंद्र रामोसे यांच्या या कार्यामुळे गावात भावनिक वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक केले आहे. भक्ती, श्रद्धा आणि आई-वडिलांप्रती असलेला सन्मान कोणत्याही मार्गाने व्यक्त करता येतो, याचे सुंदर उदाहरण महेंद्र रामोसे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!