गडावर जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी वाळूच्या अवजड वाहतुकीला दोन दिवस ब्रेक द्या अमळनेर पत्रकार संघाची मागणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

गडावर जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी वाळूच्या अवजड वाहतुकीला दोन दिवस ब्रेक द्या अमळनेर पत्रकार संघाची मागणी

 

अमळनेर: विक्की जाधव.

चैत्र नवरात्रोत्सव सुरू झाल्याने गडावर पायी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी वाळूच्या अवजड वाहतुकीला दोन दिवस पूर्णपणे ब्रेक द्यावा अशी मागणी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेने आणि संकल्प युवा फाउंडेशन अमळनेर यांनी येथील महसूल व पोलीस प्रशासनास केली आहे.

यात म्हटले आहे की चैत्र नवरात्र उत्सवास सुरुवात झाली असून यानिमित्ताने नांदुरी गडावरील सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक पदयात्रा काढून गडावर जात असतात,अमळनेर सह पारोळा,चोपडा,धरणगाव सह इतर तालुक्यातील भाविक अमळनेर-धुळे मार्गे दिवसा व रात्री देखील पायी प्रवास करीत असतात.या वर्षी देखील मोठ्या संख्येने भाविक गडावर जाणार असल्याने भाविकांना त्रास नको म्हणून दिनांक 26 व 27 मार्च असे दोन दिवस वाळू वाहतुकीच्या अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंदी करावी.जेणेकरून लहान मुले,महिला व आबालवृद्ध भाविक सुरक्षित प्रवास करू शकतील.तरी अमळनेर उपविभागाचे प्रांताधिकारी श्री भंगाळे,डीवायएसपी विनायक कोते,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकुंभ यांनी संबंधित वाळू वाहतूकदारांना याबाबत तातडीने आदेशीत करावे अशी विनंती अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!