नोबल पोदार स्कूल, अमळनेर येथे भव्य रंगभरण, चित्रकला व महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा
अमळनेर : विक्की जाधव.
येथील Noble Podar Learn School तर्फे विद्यार्थ्यांसाठी भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम २८ मार्च २०२६ रोजी पोदार कॅम्पसमध्ये होणार आहे. या स्पर्धेत नर्सरी ते इयत्ता पहिली या गटासाठी रंगभरण स्पर्धा तर इयत्ता दुसरी ते पाचवी या गटासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून प्रथम बक्षीस सायकल, द्वितीय बक्षीस एज्युकेशनल लॅपटॉप तसेच तृतीय बक्षीस एज्युकेशनल किट देण्यात येणार आहे. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

तसेच महिलांसाठी “मी आई जिजाऊ” या विषयावर भव्य वेशभूषा स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना सोन्याची नथ, चांदीचा छल्ला तसेच पैठणी अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. अलकाताई कुबल उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार असून महिलांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आयोजकांनी जास्तीत जास्त विद्यार्थी व महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.