क्रेनच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; संतप्त नागरिकांकडून रस्ता रोको

अपनी भाषा में पढ़े! Translate

क्रेनच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; संतप्त नागरिकांकडून रस्ता रोको

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील चोपडा रोडवर गजानन महाराज मंदिराजवळ काल दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिंधी समाजातील व्यावसायिक जयराम धर्मानी हे रस्त्याने जात असताना मागून आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली असून संतप्त नागरिकांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन करत अपघाताबाबत संताप व्यक्त केला.

घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्यक्तीस डंपरने नव्हे तर क्रेनने धडक दिल्याचे स्पष्ट करत नागरिकांना रस्ता मोकळा करण्याची विनंती करण्यात आली, जेणेकरून पुढील कायदेशीर कारवाई करता येईल. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!