सत्ताधारी नगरसेवकांचाच प्रशासनावर हल्लाबोल; अमळनेर ग्रामीण रुग्णालयावर गंभीर आरो

अपनी भाषा में पढ़े! Translate

सत्ताधारी नगरसेवकांचाच प्रशासनावर हल्लाबोल; अमळनेर ग्रामीण रुग्णालयावर गंभीर आरो

 

अमळनेर : विक्की जाधव.

ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून सत्ताधारी गटातील नगरसेवक नविद शेख यांनीच रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाची लाजिरवाणी परिस्थिती समोर आली आहे

रुग्णांना किरकोळ कारणांवरूनही धुळे येथे रेफर केले जात असल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना खरमरीत निवेदन दिले आहे.

रुग्णालयात सोयीसुविधा उपलब्ध असतानाही जबाबदारी टाळण्यासाठी रुग्णांना बाहेर पाठवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

विशेषतः प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना तातडीने धुळे येथे हलविण्यात येत असल्याने माता व बालकाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी गंभीर बाब त्यांनी निवेदनात नमूद केली आहे. प्रशासनाने तात्काळ संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताकीद देऊन अमळनेरमध्येच योग्य उपचार होतील याची व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा नविद शेख यांनी दिला आहे. सत्तेतीलच नगरसेवक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत असल्याने शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!