अमळनेर मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सुलोचनाताई वाघ यांची निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सुलोचनाताई वाघ यांची निवड

 

अमळनेर : विक्की जाधव.

मराठा समाज महिला मंडळ गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात कार्यरत असून मंडळाच्या अध्यक्षपदी सुलोचनाताई वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सुलोचनाताई वाघ या उच्च शिक्षित असून त्यांनी एम.ए., बी.एड. पदवी मराठी व राज्यशास्त्र विषयातून संपादन केली आहे.

त्या जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालिका म्हणूनही गेल्या तीन वर्षांपासून काम पाहत आहेत. सामाजिक क्षेत्रात कार्य करताना त्यांनी महिला दक्षता समितीच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने केले आहे.

तसेच मानव अधिकार संरक्षण समिती, दिल्ली या संस्थेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदीही त्यांची निवड झालेली आहे.गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा मोठा अनुभव असून त्यांच्या निवडीबद्दल समाजातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यात जयश्री पाटील, लीना पाटील, अलका पाटील, मंगला पाटील, सुनिता पाटील, कमल अक्का पाटील, मनीषा पाटील, माधुरी पाटील, भारती पाटील, डॉ. भारती पाटील (आधार संस्था), रागिनी पाटील, प्रभाताई पवार, पद्मजा पाटील, शीला पाटील यांचा समावेश आहे. येणाऱ्या २०२६ वर्षभरात महिलांसाठी आरोग्य, व्यवसाय मार्गदर्शन, कलागुणांना वाव देणारे उपक्रम राबविणे, तसेच समाजातील तरुण मुला-मुलींना मार्गदर्शन करणे व महिलांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी मंडळ कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!