सकल हिंदू समाज भिगवण शहर व परिसर च्या वतीने भव्य रामनवमी यात्रेचे आयोजन; महाकाल अघोरी देखावा

अपनी भाषा में पढ़े! Translate

सकल हिंदू समाज भिगवण शहर व परिसर च्या वतीने भव्य रामनवमी यात्रेचे आयोजन; महाकाल अघोरी देखावा

(निलेश गायकवाड)

भिगवन मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सकल हिंदू समाज भिगवन शहर व परिसर यांच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त भिगवन मध्ये भव्य शोभ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रमुख देखावा भिगवन मध्ये पहिल्यांदाच अघोरी दिसणार आहे.

सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने भिगवन मध्ये शोभ यात्रेचे आयोजन शनिवार दिनांक 28 मार्च 2026 सायंकाळी पाच वाजता भिगवन ग्रामपंचायत येथून ते भिगवण पोलीस स्टेशन तसेच विघ्नहर्ता चौक ते श्रीनाथ चौक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मेन पेठ व भिगवन ग्रामपंचायत या ठिकाणी शोभयात्रा संपन्न होणार.

सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने महाकाल अघोरी देखावा बघण्यासाठी भिगवन व भिगवण परिसरातील नागरिकांना या शोभ यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी व देखाव्याचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देखील देण्यात आले आहे. भिगवन मध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचा देखावा नागरिकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे 28 रोजी होणाऱ्या महाशोभ यात्रेच्या श्रीराम नवमीच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाज भिगवन व शहर व परिसर यांनी करण्यात आले आहे…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!