भिगवण मध्ये रौप्यमहोत्सवी राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला…!

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण मध्ये रौप्यमहोत्सवी राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला…!

अ. भा. मराठा महासंघ द्वारा संचलित छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला आयोजित….
अ.भा. मराठा महासंघ द्वारा संचलित छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाचे वतीने शिवजयंती निमित्त दरवर्षी होणारी राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला यावर्षी रौप्य महोत्सवात पदार्पण करीत असल्याची माहिती महासंघाचे जिल्हा संघटक राजकुमार मस्कर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष एड. पांडुरंग जगताप, इंदापूर तालुकाध्यक्ष छगन वाळके, भिगवण शाखाध्यक्ष डॉ. संकेत मोरे व मुख्य सल्लागार डॉ. जयप्रकाश खरड यांनी दिली. गेली २५ वर्षे पासून ही व्याख्यानमाला भिगवण येथे आयोजित करण्यात येत असून राज्याच्या कानाकोपऱ्यातील नावाजलेल्या दर्जेदार वक्त्यांनी ह्या व्याख्यानमालेत आपला सहभाग नोंदविला आहे. १४ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान भिगवण येथील एस. के. कलेक्शन च्या प्रांगणात भरत असलेल्या ह्या व्याख्यानमालेत प्रसिद्ध हास्यकवी व ज्येष्ठ साहित्यिक अशोक नायगावकर हे मिस्किल व कविता या विषयावर, न्यूज १८ मराठीचे ज्येष्ठ पत्रकार विलास बडे हे जीवन चक्रव्यूहातील आजचा अभिमन्यू या विषयावर, सिने अभिनेत्री व चित्रपट निर्माती श्वेता शिंदे ह्या महिलांनो अबला नव्हे तर सबला व्हा ह्या विषयावर, मुस्लिम शिव व्याख्याते शेख सुभानअली हे मानवतावादी छत्रपती शिवाजी महाराज तर राष्ट्रपती शौर्य पदक विजेते कमांडो मधुसूदन सुर्वे हे धैर्य आणि समर्पणाची शौर्य गाथा या विषयावर पुष्प गुंफणार आहेत. व्याख्यानमालेचे उद्घाटन मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे हस्ते, भिगवणचे सरपंच गुराप्पा पवार यांचे अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार दत्तात्रय भरणे, बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे व अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यानंतरच्या चार पुष्पाकरिता अनुक्रमे दौंडचे आमदार राहुलदादा कुल, करमाळ्याच्या तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व मोहोळचे माजी आमदारयशवंत तात्या माने हे अध्यक्ष म्हणून, तर भाजपचे युवा नेते प्रवीण भैय्या माने, ज्येष्ठ भाजप नेते प्रदीपदादा गारटकर, महाराष्ट्र भाजपचे विशेष निमंत्रित सदस्य मारूतराव वनवे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका ऍड. भारतीताई पाटील, दौंडच्या नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे, करमाळ्याच्या नगराध्यक्ष मोहिनी ताई सावंत, दौंडचे माजी आमदार रमेशआप्पा थोरात, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, इंदापूरचे नगराध्यक्ष भरतशेठ शहा, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व छत्रपती साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश दादा घोलप हे उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाची वतीने दरवर्षी देण्यात येणारा राजमाता जिजाऊ भूषण पुरस्कार यावर्षी बीड जिल्ह्यातील मस्याजोग येथील दिवंगत सरपंच संतोष भैय्या देशमुख यांच्या मातोश्री सौ. शारदाबाई पंडितराव देशमुख यांना प्रदान करण्यात येणार असून उत्कृष्ट नियोजन दर्जेदार व नामवंत वक्ते, त्या वक्त्यांना श्रोत्यांचा मिळणारा भव्य प्रतिसाद यामुळे व्याख्यानमाला विशिष्ट उंचीवर पोहोचली असून महाराष्ट्र मधील नामवंत व्याख्यानमाले मध्ये गणल्या जात असल्याचे ही त्यांनी सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!