जिवे ठार मारण्याच्या प्रकरणात आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी…

अपनी भाषा में पढ़े! Translate

जिवे ठार मारण्याच्या प्रकरणात आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी…

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : अमळनेर.

चोपडा तालुक्यातील देवगाव येथे घडलेल्या जिवे ठार मारण्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय ३३, रा. पुनगाव ता. चोपडा, ह.मु. देवगाव) यास १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना १४ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी देवगाव येथे घडली होती. शाब्दिक वादातून आरोपीने रविंद्र विष्राम पाटील यांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मा. जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात खटला चालला. सरकारी वकील अ‍ॅड. के. आर. बागुल यांनी एकूण ९ साक्षीदार तपासून युक्तिवाद केला. पुरावे व साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. तपासात पोलिस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!