खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीत तरुण नेतृत्वाची चर्चा; अपक्ष उमेदवार अक्षय अग्रवाल यांना सभासदांचा वाढता पाठिंबा

अपनी भाषा में पढ़े! Translate

खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीत तरुण नेतृत्वाची चर्चा; अपक्ष उमेदवार अक्षय अग्रवाल यांना सभासदांचा वाढता पाठिंबा

 

अमळनेर : विक्की जाधव.

खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले अक्षय नंदकिशोर अग्रवाल सध्या संपूर्ण मंडळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. त्यांची निशाणी चहाची केटली असून फेलो, पेट्रन व वाईस पेट्रन सभासदांमध्ये त्यांना मिळणारी जोरदार मागणी पाहता, तरुण आणि कर्तुत्ववान नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आशेने पाहिले जात आहे. पारदर्शक कारभार, सर्वसमावेशक निर्णयप्रक्रिया आणि शिक्षण संस्थांच्या प्रगतीसाठी ठोस धोरणे राबवण्याचा त्यांचा दृष्टिकोन सभासदांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करत आहे.

प्रचारादरम्यान अक्षय अग्रवाल यांनी सभासदांशी थेट संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली असून, शिक्षण मंडळात नवचैतन्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

अनुभव आणि नव्या विचारांची सांगड घालून संस्थेचा कारभार अधिक गतिमान व विश्वासार्ह करण्याची त्यांची तयारी असल्याने, खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत त्यांचे नाव ठळकपणे चर्चेत आहे.

“गेल्या अनेक दिवसांपासून प्रचारादरम्यान काही सभासदांच्या भेटी घेण्यात आल्या, तर काहींच्या वेळेअभावी भेट होऊ शकली नसेल. अशा वेळी सभासदांनी राग-द्वेष मनात न धरता मोठ्या दिलाने आणि मोठ्या मताने मला विजयी करावे,” अशी भावनिक विनंती अक्षय अग्रवाल यांनी केली असून, त्यांच्या या शब्दांमुळे सभासदांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!