माध्यमिक विद्यालय विरवाडी मदनवाडी मध्ये किचन शेडचे उद्घाटन

अपनी भाषा में पढ़े! Translate

माध्यमिक विद्यालय विरवाडी मदनवाडी मध्ये किचन शेडचे उद्घाटन

(निलेश गायकवाड)

विद्यालयास शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी बनवलेली व्यवस्था म्हणजे किचन शेड. यामध्ये स्वयंपाक घराजवळ पुरेशी जागा असणे आवश्यक असते जेणेकरून तिन्ही ऋतूंमध्ये काम करता येईल. अन्न स्वच्छ राहील. महाराष्ट्र शासनाने शालेय पोषण आहार पोषण आहार योजनेअंतर्गत अनेक शाळांमध्ये किचन शेड उभारण्यासाठी अनुदान आणि नियमावली देखील तयार केली आहे. याच माध्यमातून जय भवानी प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय विरवाडी या विद्यालयात प्रधान मंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या किचन शेड चे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी जय भवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री मारुती( नाना) बंडगर, जय भवानी प्रतिष्ठानचे सचिव श्री अनिल तांबे, श्री तेजस देवकते भाजप युवक अध्यक्ष ,समृद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुंडलिक भाऊ बंडगर, आजीनाथ सकुंडे ,गौरव वाघ ,प्रकाश शिंगाडे, निकेश साळवे, नाना बंडगर, योगेश बंडगर ,सोनू मारकड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा ढवान यांचे सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!