प्रभाग क्रमांक 13 अमळनेर नगरपरिषद निवडणूक प्रवीण भाऊ महाजन यांच्या नावाचीं चर्चा
अमळनेर नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. शहरभर निवडणुकीची नवचैतन्याची हवा फिरू लागली असून विविध उमेदवार आपल्या प्रभागासाठी धडपड करताना दिसत आहेत. मात्र, या साऱ्या गोंधळात प्रभाग 13 हा वेगळाच ठरत आहे. कारण या प्रभागात निवडणुकीचे वारे अक्षरशः प्रवीण महाजन यांच्या चर्चेने वाहताना दिसत आहे.
जमिनीवर उतरून 24 तास लोकसेवेसाठी हजर राहणारे, नागरिकांना कोणत्याही वेळी मदत करण्याचे सूत्र हाती घेतलेले प्रवीण भाऊ महाजन हेच प्रभागातील चर्चेचे केंद्र बनले आहेत. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे, कार्यशैलीमुळे आणि ‘काम आधी नाव नंतर’ या धोरणामुळे प्रभागातील तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण त्यांच्याबद्दल विश्वासाने बोलताना दिसतात.
“प्रवीण भाऊ आल्यावर विकासाची गाडी थांबणार नाही!”
परिसरात सुरू असलेल्या भेटीगाठींमध्ये नागरिक स्वतःहून पुढे येऊन प्रवीण भाऊंना पाठिंबा देत आहेत. अनेक ठिकाणी महिलांकडूनही त्यांना विशेष प्रतिसाद मिळत असून, ‘सतत उपलब्ध असणारा कार्यकर्ता’ म्हणून त्यांची ओळख अधिकच मजबूत होत आहे.