दि.२ नोव्हेंबर रोजी २५० दिव्यांगांचे मोजमाप शिरपूर येथील शिबिर संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

दि.२ नोव्हेंबर रोजी २५० दिव्यांगांचे मोजमाप शिरपूर येथील शिबिर संपन्न
भारत विकास परिषदेचे पुनर्वसन केंद्र पुणे तर्फे महाराष्ट्र नॅचरल गॅस लि या कंपनीच्या साहाय्यता निधीतून
“मोफत दिव्यांग शिबिर”


दि.२ नोव्हेंबर रोजी शिरपूर
येथे आयोजित करण्यात आले. या शिबिरासाठी गेल्या एक महिन्यापासून सर्वेक्षण टीम नोंदणी करण्यासाठी खान्देशातील मध्यप्रदेश व गुजरात बाॅर्डर वरील लहान मोठ्या गावापर्यंत प्रवास केला.म्हणून २५० पेक्षा जास्त दिव्यांगांची उपस्थिती व मोजमाप घेण्यात आले. येत्या डिसेंबरच्या महिन्यात कृत्रिम माॅड्युलर हात व पाय प्रदान करण्यात येणार आहे. ज्याची बाजारात किंमत पन्नास हजार रुपया पेक्षा जास्त आहे. यामुळे दिव्यांग बांधव आत्मनिर्भरपणे चालु फिरु शकतील. हाताचा उपयोग करु शकतील. ते समाधान.. तो आनंद …कोणत्याही पारितोषिका पेक्षा अधिक मौल्यवान असेल.
या कार्यक्रमात रक्तदान क्षेत्रात कॅन्सर व थॅलेसेमिया पेशंट करीता जीवनदायी उल्लेखनीय कार्य करणारे पनवेलचे उन्मेषभाई मोतीलाल लोहार यांचा तसेच एका दिवसात जवळपास ८९५ दिव्यांगाना हात पाय प्रदान करण्यात आले व त्याची ग्रिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्डात नोंद करण्यात आली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा.मोहनजी भागवत यांनी त्यांचा हस्ते पुणे येथे दिव्यांग मित्र पुरस्कार प्रदान केला त्या विनयजी खटावकर यांचाही सन्मान श्री गाडीलोहार समाज मंडळ शिरपूर शहर व तालुका तर्फे सन्मान करण्यात आला
कार्यक्रमास सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजयजी पाचपोर, शिरपूर चे आमदार काशीरामजी पावरा,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धुळे जिल्हा संघचालक हितेंद्रजी जैन, भारत विकास परिषदचे प्रमुख विश्वस्त विनयजी खटावकर, सिरम इन्स्टिट्युट पुणे येथील आर्थिक सल्लागार सी.ए.अभ्यंकरसो,सहकार भारतीचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीपजी पाटील, शिरपूर पोलीस विभागीय अधिकारी गोसावी साहेब, धुळे जिल्हा परिषदचे मा.अध्यक्ष डाॅ.तुषार भाऊ रंधे, राजगोपाल भंडारी,भाजपाचे बाबांबभाऊ चौधरी ,अमृतभाई लोहार नवापूर, महासंघ अध्यक्ष प्रदीप लोहार नाशिक, पनवेल चे रुधिरसेतु सेवा संस्थानचे उन्मेषभाई मोतीलाल लोहार,ठाणे येथील बी.आर.लोहार, शिरपूरचे डी.सी.लोहार सर, गाडीलोहार समाज मंडळ शिरपूर शहर व तालुक्यातील पदाधिकारी , माजी नगराध्यक्षा संगीताताई देवरे,माजी उपनगराध्यक्ष,काशीनाथ आबा माळी,वासुदेव देवरे,माजी जि.प उपाध्याक्ष देवेंद्र पाटील, माजी नगरसेवक हेमंत भाऊ पाटील, राजु टेलर, लेखक सुभाष नाना अहिरे,ओमप्रकाश बाबुलाल अग्रवाल, एम. के.भामरे,खालचे गांव बालाजी संस्थान चे उपाध्यक्ष गोपाल भंडारी,पीपल्स बॅक संचालक बाबुलाल माळी,संजय चौधरी, माजीनगरसेवक प्रताप सरदार, , सुरेश अहिरे, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई पठाण,दिलीप भाई पटेल, मार्केट कमेटी संचालक प्रसाद मोहनराव पाटील, दिव्यांग करीता कार्य करणारे श्री विकास सेन नगरसेवक जि.प.सदस्य, शिरपूर शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात सकाळपासून ८ टेबलावर नोदणी फार्म भरणे, मोजमाप घेण्यासाठी ९ केंद्रात सहाय्यक , नाश्ता, चहापान भोजन या व्यवस्था शिरपूर लोहार समाजातील बांधवांनी सांभाळली.
दिव्यांगांना वाहनातून उतरवणे मोजमाप केंद्रात ने-आण करण्यास सहकार्य करणे अश्या सर्व व्यवस्था करण्यासाठी शंभर पेक्षा जास्त कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने काम करीत होते. ट्रस्ट चे उपाध्यक्ष अरविंद उपेंद्र वैद्य, संजय भाऊ अग्रवाल स्वदेशी जागरण मंचचे विजय मंगळे धुळे
पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर आण्णा माळी, उपाध्यक्षा सुवर्णा चौधरी, कार्याध्यक्ष नितीन गिरासे, रमेश महाजन ट्रस्ट चे सौ कल्याणीदेवी बिर्हाडे, श्रीमती शोभाताई सोनवणे,राधेश्याम गुप्ता, राजेंद्र किसनसिह राजपूत बापू शिंपी, सौ.सविता वैद्य, शेखर खरे फिजीयो डाॅ. ढाके, मुरलीधर स्वर्गे सर, अभिमन पहिलवान, प्रकाश गुरव
जनकल्याण पतसंस्था शिरपूर,
श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट संचलित सरस्वती विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारीवर्ग, पतसंस्थेचे सर्व कर्मचारीवर्ग,
श्री विश्वकर्मा गाडीलोहार समाज मंडळ शिरपूर शहर व तालुका
स्व.दादासो देवराम लोहार जनकल्याण प्रतिष्ठान शिरपूर यांचा संयुक्त सहभागातून संपन्न झाला
या शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्यांनी तन मन धन अमूल्य वेळ देऊन उपस्थिती दिली त्या सर्वाचे आभार दिलीप लोहार यांनी आयोजक म्हणून व्यक्त केले विजय बागुल सर यांनी सुत्र संचलन केले
🙏🏻

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!