दिवाळीत कामगारांच्या चेहऱ्यावर उजळला आनंद.  माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम..

अपनी भाषा में पढ़े! Translate

दिवाळीत कामगारांच्या चेहऱ्यावर उजळला आनंद. माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम..

अमळनेर : विक्की जाधव.

दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उजेड आणि आपुलकीचा प्रतीक. हा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा या भावनेतून प्रभाग क्रमांक १ चे माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी यंदाही एक सुंदर परंपरा कायम ठेवली — पालिकेच्या कामगारांना भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लखलख आणली.

नगरपालिकेचे साफसफाई कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी तसेच दिवाबत्ती विभागातील कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. वर्षभर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सेवेत गुंतलेल्या या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना चौधरी यांनी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे कामगारांमध्ये उत्साह आणि समाधान निर्माण होत असून, “आमचं काम कुणीतरी ओळखतंय” ही भावना त्यांना नवचैतन्य देते. या छोट्याशा पण मोलाच्या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी माजी नगरसेवक चौधरी यांचे मन:पूर्वक आभार मानले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!