मूडी येथे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त, महसूल विभागाची कारवाई 

अपनी भाषा में पढ़े! Translate

मूडी येथे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त, महसूल विभागाची कारवाई 

अमळनेर : विक्की जाधव

आज मौजे मूडी परिसरात अनधिकृत गौण खनिज (वाळू) वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर आढळून आले. महसूल विभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई करत दोन्ही ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त केले असून, ते तहसील कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या कारवाईदरम्यान पथकात तहसीलदार श्री. रुपेशकुमार सुराणा, ग्राम महसूल अधिकारी श्री. सुधीर पाटील (गडखांब) आणि मंडळ अधिकारी श्री. नरेंद्र धनराळे यांचा सहभाग होता. पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे परिसरात अचानक धाड टाकत ही कारवाई केली.

अवैध वाळू वाहतूक थांबविण्यासाठी महसूल विभागाकडून सध्या विशेष मोहीम राबविण्यात येत असून, पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!