खडकी,देऊळगावराजे गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार : आप्पासाहेब पवार

अपनी भाषा में पढ़े! Translate

खडकी,देऊळगावराजे गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार : आप्पासाहेब पवार

दौंड च्या पूर्व भागातून पवार यांच्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद…

(निलेश गायकवाड)

:- पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजल्यात जमा आहे.
त्यातच दौंड च्या पूर्व भागात एक मोठा राजकीय भूकंप होण्याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी केले आहे.
त्यांनी खडकी, देऊळगावराजे या गटातील अनेक गावात दि.२३ रोजी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यास मतदारांनी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला,असून प्रत्येक गावातील अनेक आजी-माजी बड्या नेत्यांनी व मतदारांनी त्यांना याच गटातून निवडणूक लढवण्याचा आग्रह केलेला पाहायला मिळाला.
दौंड तालुक्यातील अजातशत्रू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचे विश्वासू सहकारी, दौंड पंचायत समितीचे माजी सभापती असताना त्यांच्या कार्यकाळात केलेली विकास कामे आणि विरोधकांनाही जवळ घेऊन चहा पाजून त्यांचे काम मार्गी लावणारे तालुक्यातील एकमेव नेते, कोणत्याही पक्षाचा अगर व्यक्तीचा विरोधक नसलेले,सामाजिक कार्य लोकसंपर्क आणि तरुणांशी घट्ट नाते असलेला, “आपला माणूस” अशी ओळख निर्माण करणारा,व खडकी देऊळगावराजे गटात मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना मिळालेला प्रतिसाद पाहता जनतेच्या मनातील “लोकप्रिय व्यक्ती” म्हणून अशी ओळख जपणारे सर्वसामान्यांचे नेते अशी त्यांची ओळख आहे.असे राजेगाव येथील काही ग्रामस्थांनी बोलून दाखवले.
सभापती असताना शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अनेक योजनांचा लाभ देणारे,सर्वांनाच अडचणीच्या काळात मदत करणारे ते एकमेव सभापती म्हणून तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत,म्हणून खडकी देऊळगावराजे या गटात त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
या गटातून अनेक उमेदवार इच्छुक असले तरी आज तरी आप्पासाहेब पवार यांचे नाव दौंड तालुक्यातील या जिल्हा परिषदेच्या गटातून निवडून येणारा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे इतर उमेदवारांना अप्पासाहेब पवार यांच्या उमेदवारीमुळे इतर अनेक उमेदवारांना धडकी भरणार हे मात्र नक्कीच.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!