July 1, 2025 10:02 am

पंढरपूर काॅंग्रेस कमिटीचे सदस्यता नोंदणी शिबीर संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

पंढरपूर काॅंग्रेस कमिटीचे सदस्यता नोंदणी शिबीर संपन्न

पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे

पंढरपूर तालुका व शहर काॅंग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक ५ मार्च २०२२ रोजी येथिल श्रीपतराव कदम यात्री निवास येथे “काॅंग्रेस सदस्यता नोंदणी शिबीर” आयोजित करण्यात आलेले होते.याप्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे सचिव मा.राजेंद्र शेलार साहेब हे प्रमुख उपस्थितीत होते.तर शिबीराच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डाॅ.धवलसिंहजी मोहिते पाटील हे होते.

याप्रसंगी पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अमरजित पाटील यांनी तालुक्यातील दहा जिल्हा परिषद व वीस पंचायत समिती गणांमधून मुख्य नोंदणीकर्त्यांची नेमणुक करण्यासाठी सत्तर गावामधील कार्यकर्त्यांच्या नावांची यादी प्रदेश सचिव शेलार साहेब व जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडे सुपुर्द केली.तर शहराध्यक्ष ॲड.राजेंद्र भादुले यांनी शहरातील प्रभाग निहाय यादी सादर केली.याप्रसंगी प्रदेश सचिव राजेंद्र शेलार साहेब यांनी काॅंग्रेस सदस्यता नोंदणी अभियान प्रत्येक गावखेड्यातील शेवटच्या माणसापर्यंत जावून यशस्वी करण्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन केले.व उपस्थितीतांच्या प्रश्नांवर शंकासमाधान केले.जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी एकतीस मार्च पर्यंत जास्तीत जास्त काॅंग्रेस सदस्य नोंदणी करुन सदस्यता नोंदणी अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी जिल्हा काॅंग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष बजरंगदाजी बागल,साधनाताई उगले,नागणे गंगेकर,सुहास भाळवणकर,जिल्हा सचिव राजेंद्र उराडे,तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष राहुल कौलगे पाटील,महिला तालुकाध्यक्षा राजश्री लोळगे,शहराध्यक्षा आशा बागल,डाॅ.रामदास घाडगे,सुभाष गायकवाड,मिलींद मोलाणे,प्रमोद आवटे,दिनेश माने,समाधान रोकडे,संग्राम जाधव,विश्वास नागणे,अक्षय शेळके सह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!