साप चावलेल्या तरुणीचा जीव वाचवण्यात नर्मदा मेडिकल फाउंडेशनचा यशस्वी प्रयत्न.
अमळनेर : विक्की जाधव.
दापोरी पातोंडा येथील २२ वर्षीय अनिता भील या तरुणीला जहरी न्युरोपॅरालिटिक सापाने चावल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. रुग्णाला 108 अॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही, त्यामुळे तिला पातोंडा व अमळनेर ग्रामीण रुग्णालयांसह दोन-तीन ठिकाणी फिरावे लागले. शेवटी वेळ निघून जाण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर येथे दाखल करण्यात आले. तेथे डॉ. अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संदीप जोशी व त्यांच्या कुशल टीमने तात्काळ उपचार सुरू करून रुग्णाचा जीव वाचवला.

रुग्णालयात दाखल होताच आपत्कालीन विभागाने वेगाने उपचार देत ऑक्सिजन आणि श्वसन सहाय्य (Respiratory Support) दिले. अँटी-स्नेक व्हेनम (ASV) प्रोटोकॉलनुसार औषधोपचार तातडीने सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी निओस्टिगमिन आणि अॅट्रोपिनच्या सहाय्याने विषबाधेचा परिणाम कमी केला. केवळ २४ तासांत अनिताची प्रकृती सुधारली, श्वसन नॉर्मल झाले, पापण्या व स्नायूंचे नियंत्रण परत आले आणि काही दिवसांत ती पूर्णपणे बरी होऊन डिस्चार्ज देण्यात आली.

डॉ. अनिल शिंदे यांचे नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर हे उत्तर महाराष्ट्रातील विश्वसनीय आपत्कालीन व आयसीयू सेंटर म्हणून सातत्याने कार्यरत आहे. डॉ. अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हे रुग्णालय समूह “वेळीच केलेला उपचार म्हणजे मृत्यूवर विजय” या तत्त्वावर काम करत असून, प्रत्येक गंभीर रुग्णासाठी आशेचा किरण ठरत आहे.
