अमळनेर प्रशासनाची धडक कारवाई! अनधिकृत रेती वाहतूक करणारा डंपर जप्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर प्रशासनाची धडक कारवाई! अनधिकृत रेती वाहतूक करणारा डंपर जप्त.

 

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यातील मौजे गलवाडे रोड परिसरात आज महसूल विभागाने मोठी कारवाई केली. मा. उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे साहेब तसेच मा. तहसीलदार श्री. रुपेश कुमार सुराणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालवण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत 1 अनधिकृत गौण खनिज (रेती) वाहतूक करणारा डंपर आढळून आला. त्वरित कारवाई करत सदर डंपर जप्त करून तहसिल कार्यालय, अमळनेर येथे जमा करण्यात आला.

या कारवाईत महसूल विभागाच्या पथकाने अत्यंत तत्परता आणि जबाबदारीने कार्य केले. या पथकात श्री. जितेंद्र पाटील (ग्राम महसूल अधिकारी, शिरसाले बु.), श्री. संदीप माळी (मांडळ), श्री. विकेश भोई (बाम्हने), अमोल चक्रे (जवखेड़े), आकाश गिरी (पातोंडा), सुधीर पाटील (गडखाब) आणि पवन शिंगारे (सावखेड़े) तसेच अभिमान जाधव (कन्हेरे) हे अधिकारी सहभागी होते.

अमळनेर तालुक्यात अनधिकृत रेती वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने घेतलेली ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे.

या कारवाईमुळे अनधिकृत खनिज वाहतूक करणाऱ्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला असून प्रशासन अशा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!