अमळनेर पाणीपुरवठा प्राधिकरणचे उपविभागीय अधिकारी लाच घेताना अटक – सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात कारवाई.
अमळनेर : विक्की जाधव.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमळनेर येथे मोठी कारवाई करत महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण, अमळनेर विभागाचे उपविभागीय अधिकारी दिलीप दत्तात्रय पाटील यांना 4,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव पथकाने केली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत मौजे हिंगणे (ता. चोपडा) येथे ३,४५,००० रुपयांचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराकडून दिलीप पाटील यांनी २ टक्के म्हणजे ६,००० रुपयांची लाच मागितली होती. ठेकेदाराने ही मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार स्वरूपात नोंदवली. तपासानंतर आज (१५ ऑक्टोबर २०२५) रोजी आयोजित सापळा कारवाईदरम्यान उपविभागीय अधिकारी पाटील हे ठेकेदाराकडून लाच स्वीकारताना पकडले गेले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा अवतार, विलास पाटील, हेमंत महाले, नरेंद्र पाटील, सखाराम सुतार यांच्या पथकाने केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ह्या कारवाईमुळे अमळनेर विभागातील प्रशासनात खळबळ उडाली असून, जलजीवन प्राधिकरणातील कामकाजावरील प्रामाणिकतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या महिनाभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची अमळनेरात ही दुसरी कार्यवाही आहे. ह्या ही विषयात अमळनेर चर्चेत आले आहे.