न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

प्रताप महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा.

 

अमळनेर : विक्की जाधव.

खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त) अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारताचे ११ वे राष्ट्रपती शास्त्रज्ञ,भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त करिअर कौन्सिलिंग सेंटर याठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण डॉ.अमित पाटील,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.नलिनी पाटील,डॉ.प्रियंका पाटील,डॉ.हेमंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर डॉ.विजय तुंटे यांनी प्रकाश टाकले.ते म्हणाले की, गेली चार दशके वैज्ञानिक क्षेत्रात मूलभूत योगदान देणारे डॉ.कलाम हे अतुलनीय व्यक्तीमत्व होते,ज्ञानार्जनासाठी वाचन महत्वाचे असून वाचनाने मनुष्य श्रीमंत होतो.युवकांनी आपला वेळ व्यक्तिमत्त्व व राष्ट्र घडविण्यासाठी खर्च करावे आणि जिज्ञासू वृत्तीने प्रश्नांचे चिंतन करावे,अशा स्वरूपाचे मागर्दशन केले.

यावेळी ग्रंथपाल दिपक पाटील यांनी ग्रंथालय व वाचन कक्ष आपल्या जीवनात किती महत्वाचे आहे,याबाबतची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी प्राचार्य डॉ.जाधव एच डी, डॉ.शशिकांत सोनवणे,डॉ.धिरज वैष्णव,डॉ.सुनील राजपूत,प्रा.दिलीप तडवी,डॉ.हर्ष नेतकर,दिलीप शिरसाठ,पराग रविंद्र पाटील,विशाल अहिरे आदींनी सहकार्य केले.यावेळी असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनीना विविध पुस्तकांचा परिचय करून देण्यात आले,प्रस्तुत कार्यक्रमास विद्यार्थ्यांची उपस्थिती ही लक्षणीय होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!