दिवाळीत खासगी बसने प्रवास महागला? आता RTO ची थेट कारवाई!

अपनी भाषा में पढ़े! Translate

दिवाळीत खासगी बसने प्रवास महागला? आता RTO ची थेट कारवाई!

मुंबई | प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

दिवाळी जवळ आली की, गावाकडे जाणाऱ्यांची रेलचेल वाढते. या संधीचा गैरफायदा घेत अनेक खासगी बस चालक तिकीट दरात मनमानी वाढ करतात. मात्र यंदा प्रवाशांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) सक्रीय झाला आहे. आता खासगी बस चालकांना एसटी दराच्या जास्तीत जास्त दीडपट इतकं भाडं आकारण्याची परवानगी राहील, याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

🔴आरटीओचा इशारा: मनमानी भाडेवाढ खपवून घेतली जाणार नाही

आरटीओ अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितले की, “खासगी बस चालकांनी जर एसटीच्या दीडपट दरापेक्षा अधिक शुल्क आकारले, तर त्यांच्या विरोधात कठोर आणि त्वरित कारवाई करण्यात येईल.” त्यामुळे यंदा सणासुदीच्या काळात प्रवाशांचे आर्थिक शोषण थांबवण्याचा निर्धार आरटीओने व्यक्त केला आहे.

🟢प्रवाशांसाठी खास मार्गदर्शक सूचना — तक्रार नोंदवताना द्या ही माहिती

जर तुमच्याकडून एखाद्या खासगी बस चालकाने अधिक दर आकारला असेल, तर तुम्ही थेट RTO कडे तक्रार दाखल करू शकता. तक्रार करताना पुढील माहिती आवश्यक आहे :

1. प्रवाशाचे पूर्ण नाव आणि मोबाईल क्रमांक

2. तिकिटाचा फोटो (पुरावा म्हणून)

3. तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क :

📞 हेल्पलाइन क्रमांक: 8275330101
📧 ई-मेल: rto.12-mh@gov.in

🟣जागरूक नागरिकांची गरज

आरटीओने नागरिकांना आवाहन केले आहे की, “प्रवास अधिक पारदर्शक व सुरक्षित बनवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, अनियमितता आढळल्यास त्वरित तक्रार करावी.”

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!