क्रीडा विभागाच्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या चाहत अशोक पाटील हिची विजयी होत विभाग स्तरावर निवड
अमळनेर : विक्की जाधव.
जळगाव येथे आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभाग आणि जिल्हा क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कॅरम स्पर्धेत ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या अंडर 17 वयोगटातील विद्यार्थिनी चाहत अशोक पाटीलने विजेतेपद पटकावले आहे म्हणून तिची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे . चाहतच्या या विजयामुळे ॲड .ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात पुन्हा एकदा विजयाचा तुरा रोवला गेला आहे.

या स्पर्धेत विजयी चाहतचे जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲड .ललिता पाटील यांनी कौतुक केले व प्राचार्य डॉ. नीरज चव्हाण यांनी चाहतचे अभिनंदन केले आहे. .या स्पर्धेतील विजयी चाहतला प्रशिक्षित करण्यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री केदार देशमुख, श्री सागर चावरिया,श्री रमेश धनगर आणि श्रीमती ममता पाटील यांनी अपार कष्ट घेतले. शाळेतील सर्व शिक्षकांनी चाहतचे कौतुक केले असून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.