जीडीबी पेंट्स व रोटरी क्लब ऑफ भिगवण वतीने परिसरातील २० शाळांचे रंगकाम पूर्ण…

अपनी भाषा में पढ़े! Translate

जीडीबी पेंट्स व रोटरी क्लब ऑफ भिगवण वतीने परिसरातील २० शाळांचे रंगकाम पूर्ण…

(निलेश गायकवाड)

भिगवण: रोटरी क्लब ऑफ भिगवण आणि जिडीबी पेंटस यांच्या वतीने परिसरातील २० शाळांचे रंगकाम पूर्ण करण्यात आले असल्याने शाळांचे रुपडे पालटले आहे. नुकताच शाळांचे रंगकाम पाहण्याचा कार्यक्रम परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.

शाळेला रंगकाम करण्यासाठी जीडीबी पेंट्स अँड कोटिंग कंपनीच्या वतीने रंग उपलब्ध करून देण्यात आला होता. यासाठी रोटरी क्लब आणि जीडीपी पेंटस यांनी १ कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च केला. सदर रंगकामाचे पाहणी करण्यासाठी व शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिडीबी कंपनीचे संतोष कुमार बगारिया, अतुल कुलकर्णी रोटरीचे डिजी संतोष मराठे, शीतल शहा, पंकज शहा, वसंत वाळुंजकर आले होते त्यांचे पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत स्वागत करून सर्व रोटरीयन यांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला. यामध्ये भिगवण, पळसदेव, शेटफळगढे आदी परिसरातील शाळांना भेटी देण्यात आल्या शाळेचे डिजिटल रंग रंगोटीने बदललेले रूप पाहून सर्वच पाहुणे अचंबित झाले.

यावेळी भिगवण रोटरी क्लबचे संस्थापक सचिन बोगावत विद्यमान अध्यक्ष निखिल बोगावत, प्रवीण वाघ, संतोष सवाणे, रियाज शेख, संजय चौधरी, रणजीत भोंगळे, संपत बंडगर,कुलदीपक ननावरे, किरण रायसोनी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!