बडगुजर समाज नवोदय युवा मंच च्या जिल्हा सरचिटणीसपदी राहुल बडगुजर यांची निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

बडगुजर समाज नवोदय युवा मंच च्या जिल्हा सरचिटणीसपदी राहुल बडगुजर यांची निवड

अमळनेर : विक्की जाधव

सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात समाजासाठी नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या अखिल भारतीय बडगुजर समाज नवोदय युवा मंच तर्फे जळगाव जिल्हा सरचिटणीसपदी राहुल अशोक बडगुजर (अमळनेर) यांची निवड करण्यात आली आहे. समाजहितासाठी कार्य करण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत, संस्थापक अध्यक्ष अमित बडगुजर फागणे व कार्याध्यक्ष प्रशांत बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

समाजातील युवकांना संघटित करून ग्रामीण भागात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवण्याचे कार्य नवोदय युवा मंच गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. या मंचाच्या माध्यमातून जिल्हा, तालुका व राज्यस्तरावर समाजजागृतीसाठी युवकांचा सहभाग वाढवला जात असून, सामाजिक बांधिलकी दृढ करण्यावर भर दिला जात आहे.

राहुल बडगुजर यांच्या या निवडीमुळे अमळनेर व जळगाव जिल्ह्यातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळून विविध विकासात्मक उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!