अमळनेर येथे मा.बच्चू कडू साहेबांची सभा!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर येथे मा.बच्चू कडू साहेबांची सभा!

मा.बच्चू कडू साहेब ५/१०/२०२५ ला जळगाव जिल्हा दौरा करीत आहेत.त्याचा भाग म्हणून अमळनेर येथे दुपारी २ वाजता इंदिरा गांधी भवन, (अमळनेर नगरपालिका समोर )मधे सभा आयोजित आहे.
आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शिवराम पाटील, अमळनेर तालुका अध्यक्ष श्री संतोष बाबुराव पाटील, युवा अध्यक्ष श्री रवि पाटील यांनी आढावा बैठक घेतली.
दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष श्री दिलीप कासार यांच्या कार्यालयात बैठक घेतली.५/१०/२०२५ रोजी च्या सभेसाठी इंदिरा गांधी भवन बुक केले.शिवाय अमळनेर तहसील कार्यालय समोरच्या बळी राजाच्या पुतळ्याला अभिवादन करून बैलगाडी ने मा.बच्चू कडू साहेब इंदिरा गांधी भवन पर्यंत जातील.सोबत डी जे वाद्य आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकारी , व्यापारी , विद्यार्थी व शेतकरी असतील.
सभा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरांच्या संघटना आणि दिव्यांग संघटना मा.बच्चू कडू साहेब यांची सदिच्छा भेट घेतील.
सभेचे प्रमुख वक्ते मा.बच्चू कडू आणि जिल्हा अध्यक्ष शिवराम पाटील असतील.कार्यक्रमाचे नियोजन,संचालन, समालोचन तालुका अध्यक्ष श्री संतोष पाटील करतील किंवा नामनिर्देश करतील.
सभेचा मुख्य हेतु , फडणवीस यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी आहे.तसेच पीक विमा,पीक पाहाणी,शेत रस्ता व शेत मोजणी हे असतील .दिव्यांगांचे अनुदान दरमहा पंधराशे वरून अडीच हजार करणे आवश्यक आहे.
सभेची परवानगी साठी मा.पोलिस निरीक्षक साहेब आणि मा.तहसिलदार साहेब यांना पत्र देऊन समक्ष भेट शिवराम पाटील आणि संतोष पाटील,रवि पाटील यांनी घेतली.
अमळनेर शहरात भ्रमण आणि भेटी घेतल्या असता जाणवले कि सामान्य नागरिक आणि व्यावसायिक मा.बच्चू कडू यांच्या भेटीची आणि भाषणाची वाट पाहात आहेत.जमीनीवरचा नेता आणि जनतेचा चाहता नेता अशी ओळख असल्याचे जनमत बनलेले आढळले.
तालुका अध्यक्ष श्री संतोष पाटील यांनी सभेचे, प्रचाराचे नियोजन उत्तम प्रकारे केल्याची माहिती शिवराम पाटील यांनी मा.बच्चू कडू यांना दिली आहे.

… संतोष बाबुराव पाटील
अमळनेर तालुका अध्यक्ष
प्रहार जनशक्ती पक्ष.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!