सुरंगली येथील गावकऱ्यां कडुन आन्वा येथील हेमाडपंथी शिव मंदिरात मास आढळलेल्या घटनेचा जाहीर निषेध।।
सुरंगली वार्ताहर ।। भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे शुक्रवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी शिवभक्तांना हेमाडपंथी मंदिरात मास आढळले होते.या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आन्वा गाव शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी बंद पाळण्यात आला होता. पारध पोलीसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास भोकरदन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नितिन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने हे करीत आहे.भोकरदन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नितिन कटेकर.भोकरदन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी आन्वा येथे भेट देऊन गावकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिलं आहे.भोकरदन चे आमदार संतोष भाऊ दानवे यांनी आन्वा येथे भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आणि पोलिस अधिकारी यांना सुचेना दिल्या.या घटनेचा सुरंगली येथील गावकऱ्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला असुन लवकरात लवकर दोषींना अटक करण्यात यावी. आणि दोषींवर वर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी सुरंगी गावकऱ्यांनी केली.
यावेळी सोयगाव मंडळ अध्यक्ष दिपक सेठ जाधव ,माजी सरपंच संजीव पाटील,माजी उपसरपंच संजय वामनराव पाटील, विश्वनाथ पाटील माजी उपसरपंच,धनराज काळे, तुकाराम जाधव पहलवान,अधीर रामदास जाधव, गजानन वानखेडे, गणेश काळे, गोविंदा वाघ, योगेश जाधव, गजानन यादव जाधव,फकीरबा जाधव,संजय शेनफड दांडगे,अनिल साहेबराव जाधव,राजीव जाधव, अमोल नेवरे, भास्कर दांडगे,मनोहर रामजी दांडगे, समाधान मनोहर जाधव, भास्कर दांडगे,शेख एजाज भै, रंगनाथ माळोदे यांच्या सह अनेक गावकरी या वेळी उपस्थित होते.