शिरपूर तालुक्यात जिप शाळेत महिला शिक्षिका नाहीत शिक्षणमंत्री ना भुसे, ग्रामविकास मंत्री ना. गोरे, पालकमंत्री ना. रावल यांना भाजपाचे अरुण धोबी यांनी भेट घेवुन दिली माहिती

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर तालुक्यात जिप शाळेत महिला शिक्षिका नाहीत शिक्षणमंत्री ना भुसे, ग्रामविकास मंत्री ना. गोरे, पालकमंत्री ना. रावल यांना भाजपाचे अरुण धोबी यांनी भेट घेवुन दिली माहिती

शिरपुर : धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यात शाळांमध्ये मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा घालता यावा, १ ते ८ शाळांवर शिक्षिका असणे बंधनकारक केले आहे. मात्र, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २६९ शाळांपैकी १०५ शाळांमध्ये शिक्षिका आहेत, तर १६४ शाळांत शिक्षिका नाहीत. त्यामुळे मुलींच्या अडचणी कोण समजून घेणार, अशी मोठी समस्या शिरपुर तालुक्यातील जिप शाळेत आहे अशी माहिती धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी (दि. २३ सप्टेंबर) रोजी राज्याचे शिक्षणमंत्री ना. दादा भुसे, ग्रामविकासमंत्री ना. जयकुमार गोरे व पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांना मंत्रालयात मुंबई येथे भेटुन हि समस्या सविस्तरपणे सांगितली. व सविस्तर असे निवेदन यावेळी या मंत्र्यांना अरुण धोबी यांनी दिले. मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात अरुण धोबी यांनी म्हटले आहे की, शाळा व आश्रमशाळा, वसतिगृहात महिला कर्मचारीच कमी असल्याने अथवा काही शाळांत महिला कर्मचारीच नसल्याने योग्य वेळी मुलींचे समुपदेशन होत नसल्याने अशा घटना घडतात. मुली आपले त्रास, समस्या महिला कर्मचारी किंवा शिक्षिकांकडे मनमोकळेपणाने सांगू शकतात. मात्र, त्याच समस्या पुरुष कर्मचाऱ्यांकडे सांगताना त्या काहीसा संकोच करतात. परिणामी शाळा अथवा कार्यालयात घडणाऱ्या विपरीत घटना घडतात. त्यामुळे विशेषकरून शाळांमध्ये महिला कर्मचारी मोठ्या संख्येने असाव्यात. शाळांत महिला कर्मचारीच नसतील, तर मुलींचे समुपदेशन कसे होईल, असे हि निवेदनात नमुद केले आहे. शासनाच्या नियमांची अमंलबजावणी व्हावी अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे. आमचा शिरपूर आदिवासी बहुल तालुका म्हणून समजला जातो. त्यात बहुतांशी जिल्हा परिषदेच्या शाळा या आदिवासी गाव-पाड्यावर आहेत. त्यातील काही शाळा पडक्या इमारतीत, झोपडीवजा घरात विद्यार्थ्यांना ज्ञार्नाजनाचे काम केले जाते. शिरपूर तालुक्यातील अभय अरण्य क्षेत्रातील शाळांना गेल्या काही वर्षापासून वर्गखोल्या बांधकामासाठी परवानगी मिळत नसल्यामुळे कुड्याच्या घरातच शाळा भरली जात आहे. त्यामुळे आदिवासी भागातील बहुतांशी शाळांवर महिलांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. शिरपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २६९ शाळांपैकी १०५ शाळांमध्ये महिला शिक्षिका आहेत, तर १६४ शाळांत शिक्षिका नाहीत. त्यामुळे शिरपूर तालुक्यातील शाळांमध्ये समुपदेशन कसे होणार तरी आपण शिरपुर तालुक्यातील या समस्यांकडे लक्ष द्यावे असे धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी (दि. २३ सप्टेंबर) रोजी राज्याचे शिक्षण मंत्री ना. दादा भुसे, ग्रामविकासमंत्री ना. जयकुमार गोरे व पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांना मंत्रालयात मुंबई येथे भेटुन हि समस्या सविस्तरपणे मांडली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!