शिवसेना (उबाठा) अमळनेर तालुकाध्यक्षपदी राजेंद्र मराठे यांची नियुक्ती

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिवसेना (उबाठा) अमळनेर तालुकाध्यक्षपदी राजेंद्र मराठे यांची नियुक्ती

 

 

अमळनेर : विक्की जाधव.

नांद्री येथील रहिवासी असलेले राजेंद्र मराठे यांची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदशनाखाली व युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार अमळनेर तालुक्याच्या शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

नुकतीच शिवसेनेच्या सामना ह्या मुखपत्रातून जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील तालुका प्रमुखांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.राजेंद्र मराठे हे पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष संघटनवाढीसाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याने व पक्षाचे संघटन,शेतकऱ्यांच्या समस्या,ग्रामस्थांच्या तक्रारी सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील व कटिबद्ध असल्याने त्यांची निवड करण्यात आली. त्याआधी ते तालुक्याच्या युवाप्रमुख म्हणून त्यांनी चांगली कामगिरी बजाबली आहे.त्याप्रसंगी त्यांच्या निवडीचे अमळनेर शिवसेना उबाठा पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन केले जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!