ऐन उत्सवात साथीच्या आजारांचे विघ्न.
अमळनेर : विक्की जाधव.
तालुका सध्या उत्सवाच्या जल्लोषात रंगला असताना डेंग्यू, गॅस्ट्रो, व्हायरल फिव्हर यांसारख्या साथीच्या आजारांनी मात्र नागरिकांचे डोकेदुखी वाढवली आहे. तालुक्यातील अनेक भागांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून रुग्णालयात गर्दी वाढली आहे.
अमळनेर शहरात पिण्याचे पाणी गढूळ स्वरूपात पुरवठा होत असल्याने आजारांना खतपाणी मिळत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. बदलत्या हवामानामुळेही संसर्गजन्य आजारांना ऊत आला आहे. आरोग्य विभागाकडून सर्वसामान्यांना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पाण्याचे स्रोत झाकून ठेवणे, गढूळ पाणी उकळून पिणे, डासांची पैदास होऊ न देणे तसेच ताप, उलटी, जुलाब यांसारखी लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
