अमळनेरचे जडणघडणीतले मार्गदर्शक व्यक्तिमत्व – बजरंगलाल अग्रवाल यांना विविध स्थरावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरचे जडणघडणीतले मार्गदर्शक व्यक्तिमत्व – बजरंगलाल अग्रवाल यांना विविध स्थरावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर शहराच्या सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात मोलाची भूमिका निभावणारे नाव म्हणजे आदरणीय बजरंगलाल अग्रवाल. आपल्या दूरदृष्टी, परिश्रम आणि समाजहिताच्या कार्यामुळे अग्रवाल यांचे नाव शहरात आदराने घेतले जाते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बजरंगलाल अग्रवाल हे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे मार्गदर्शक तर आहेतच, परंतु त्यांनी अमळनेरमध्ये विकासाचा नवा अध्याय लिहित अनेक उपक्रम राबवले. बजरंग सुपर मार्केट, प्रमुख पेट्रोल पंप, बन्सीलाल पॅलेस या संस्थांची त्यांनी स्थापना करून व्यापारी जगतात नवे मानदंड निर्माण केले. त्यांच्या पुढाकारामुळे अमळनेरला आधुनिक सुविधा व गुणवत्तापूर्ण सेवा लाभल्या. बजरंगलाल अग्रवाल यांचे व्यक्तिमत्व केवळ व्यवसायापुरते मर्यादित नाही. ते सदैव समाजघडणीत, शैक्षणिक प्रगतीत व सामाजिक बांधिलकीत सक्रिय राहिले आहेत. त्यांचे योगदान अमळनेरच्या जडणघडणीत अविस्मरणीय ठरले असून, आजच्या पिढीसाठी ते प्रेरणादायी आहेत. शहरवासीय त्यांना ‘अमळनेरचे मार्गदर्शक व्यक्तिमत्व’ म्हणून गौरवितात.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा – आरोग्य, आनंद व दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. विविध समाज माध्यमातून दिली जात आहे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!