मिसिंग;बावधन पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंद
बावधन पोलिस ठाणे पुणे, मिसिंग रजि. नोंद क्रमांक 2025, दि. 18/7/2025.
तक्रारदार – सुनिल बापू भोसले, रा. बावधन, पुणे. मो. नं – 9112009974
यांची तक्रार दि. 10/7/2025 रोजी सकाळी 10. 00 वाजता नेहमी प्रमाणे औंध पुणे येथे कामावर गेले होते. कामावरून सायंकाळी सहा वाजता घरी परत आले असता घरामध्ये त्यांची पत्नी व दोन मुले दिसून आली नाहीत. त्याचा आजूबाजूला शोध घेऊन विचारपूस केली असता ते मिळून आले नाहीत. त्यांचा आजपर्यंत नातेवाईक, मित्रांकडे तसेच शेजारी पाजारी चौकशी केली असता ते मिळून आले नाहीत. म्हणून त्यांनी तक्रार दाखल केली असून त्यांचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.
1.पत्नी – रेष्मा सुनील भोसले, वय 33, रंगाने निमगोरी, अंगाने मध्यम, केस काळे, उंची 5 फुट 3 इंच, डोळे – काळे पांढरे, नाक – सरळ, चेहरा – गोल.
2. मुलगा – संघराज सुनील भोसले, वय – 9 वर्षे, रंगाने – गोरा, अंगाने – मध्यम, उंची 2 फुट 5 इंच, नाक – सरळ, चेहरा – उभट, अंगात जीन्स पॅन्ट, टी शर्ट.
3. अम्रुता सुनील भोसले, वय – 9 वर्षे, रंगाने – गोरी, अंगाने मध्यम, उंची 2 फुट 2 इंच, चेहरा उभट, अंगात जीन्स पॅन्ट, टी शर्ट.
हे सर्वजण दि. 10/7/2025 रोजी सायंकाळी सहा वाजता या दरम्यान चंदू दगडे यांचे खोलीत भाड्याने, बावधन पुणे येथून कोणास काही न सांगता कोठेतरी निघून गेले आहेत. त्यांचा आजपर्यंत शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. तरी कुठे आढळून आल्यास, सुनील बापू भोसले, 9112009974 या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.