कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना आरोग्य यश आणि किर्ती मिळावी यासाठी महादेवाला घातले साकडे;माजी सरपंच अश्विनी शेंडगे यांनी
(निलेश गायकवाड)
श्रावण महिना हिंदु धर्मियांसाठी उपासनेचा व श्रधेचा मानला जातो यामुळे या महिन्यात हिंदु धर्मिय बांधव मोठ्या प्रमाणात हिंदु देव देवतांची पुजा आर्चा करुन देवाला साकडे घालत असतात भिगवण मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील आज श्रावणी सोमवार निमित्त महादेवाला अभिषेक घालत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आरोग्य यश आणि किर्ती मिळावी यासाठी साकडे घातले.
भिगवणच्या माजी सरपंच अश्विनी शेंडगे आणि महेशभाउ शेंडगे यांनी आज मल्लिनाथ मठातील मंदिरात महादेवाला अभिषेक केला तर दिवसभर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद देण्यात आला तर आयुर्वेदात महत्वाचे स्थान असलेल्या बेलाच्या १०८ वृक्षांचे वाटप केले.
यावेळी मदनवाडीचे माजी सरपंच तुकाराम बंडगर, रोटरीचे अध्यक्ष निखील बोगावत, आबा बंडगर,अजिंक्य माडगे, बापु थोरात, प्रविण वाघ, प्रदिप वाकसे, सचिन बोगावत, आणा धवडे माउली मारकड, विट्ठल थोरात आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मोहन शेंडगे मित्र परिवाराने केले होते.