प्रशासनकडून गणेशोत्सव तयारीला वेग – रस्त्यांच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी
अमळनेर : विक्की जाधव.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. बैठकीत विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. गणेशउत्सव काळात वीज, पाणी, आरोग्य, वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर आखणी करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. नागरिकांच्या सोयीसाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे, असा स्पष्ट संदेश बैठकीतून देण्यात आला.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर तरीही अमळनेर खड्ड्यामयं..
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असताना अमळनेर शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे मुद्दे बैठकीत अधोरेखित झाले. खड्डेमय रस्त्यांमुळे गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव काळात अपघात झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती करून सुरक्षित रस्त्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रशासनाच्या तयारीमुळे आणि नागरिकांच्या सहभागामुळे यंदाचा गणेशोत्सव अमळनेरमध्ये आनंद, उत्साह व सुरक्षिततेच्या वातावरणात साजरा होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, डीवायएसपी विनायक कोते, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, पी आय दत्तात्रय निकम, पालिकेचे मुख्य अधिकारी तुषार नेरकर, आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.