July 1, 2025 1:24 am

सामाजिक बांधिलकी – आगळा -वेगळा विविध सामाजिक उपक्रमाने केला वाढदिवस साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

सामाजिक बांधिलकी – आगळा -वेगळा विविध सामाजिक उपक्रमाने केला वाढदिवस साजरा

प्रतिनिधी अमळनेर आगळा -वेगळा विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला योगेशभाऊनीं वाढदिवस. गो-पालन कर्ते त्रिकोणी बाग जवळील कुसुमताई,आशाताई ,चारुताई यांना चाऱ्यासाठी दिली आर्थिक मदत तर मुक्या प्राण्यांची सेवा करणारे नांदुभाऊंचा केला सन्मान दिली आर्थिक भेट. अमळनेर येथील ओम स्वामी ठिबक कंपनी चा सातवा वर्धापन दिवस व योगेशभाऊचा वाढदिवस हा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार समारंभाने आणि विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
युवा उद्योजक योगेश पाटील यांनी सुरू केलेली ओम स्वामी ठिबक कंपनी ही नवीन युवक उद्योजकांना प्रेरणा देणारी आहे ग्रामीण भागातील युवकांनी योगेश पाटलांचा आदर्श घेऊन उद्योजक होणे योग्य राहील असे प्रतिपादन यावेळी कार्यक्रमास उपस्थित पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख मान्यवर श्री सुभाष अण्णा चौधरी, माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील यांनी बोलतांना केले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक सौ तिलोत्तमाताई पाटील, अर्बन बँकेचे संचालक लालचंद सैनानी, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, डी वाय एस पी राकेश जाधव साहेब, ओमस्वामी ठिबक कंपनी चे प्रेरणा स्थान पोस्टमास्टर बी एस पाटील ,खादी ग्रामोद्योगचे एन के पाटील, ना,तहसीलदार एस एम पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम एच पाटील, विठ्ठल पाटील, गुणवंत पवार, नगरसेवक मनोज पाटील,अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन प्रविण पाटील, योगेशभाऊ बाग,सेवानिवृत्त सैनिक पंकज पाटील, हभप उमेश महाराज,सौ वसुंधरा लांडगे,प्रा.आर व्ही पाटील, पीएसआय मोरे साहेब,ना.तहसिलदार ए.टि.पाटिल,सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप पाटिल महेंद्र पाटील विमा प्रतिनिधी,रवी,विकी भाऊ, पाटील कंपनीचे वर्कर विशाल पाटिल,अप्पा पाटिल ,दत्तू पाटिल ,हेमांशु पाटिल, फोटो ग्राफ़र शुशील भोईटे ,, आदी। मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात. आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून उद्योजक योगेश। पाटील यांनी प्राणी दया या उद्देशाने मुक्या प्राण्यांची सेवा करणारे नंदू भाऊ पाटील यांच्या गोसेवेच्या उपक्रमाला आर्थिक मदतीचा धनादेश देऊन सत्कार केला. कुसुमताई ,आशाताई व चारुताई यांना गो मातेच्या चाऱ्यासाठी आर्थिक मदत दिली सुत्रसंचालन जगतगुरु गुरुवर्य बहुउद्देशीयसेवा मंडळाचे अध्यक्ष एस एम पाटील यांनी केले तर आभार योगेशभाऊ यांनी मानलेत

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!