अमळनेर देशभक्तीच्या रंगात “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत प्रांत अधिकारी नितीन मुंडावरेचे भावनिक आवाहन…

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर देशभक्तीच्या रंगात “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत प्रांत अधिकारी नितीन मुंडावरेचे भावनिक आवाहन…

 

अमळनेर : विक्की जाधव.

“हर घर तिरंगा” अभियानांतर्गत प्रांत अधिकारी नितीन मुंडावरे साहेब यांनी स्वतःच्या घरावर तिरंगा अभिमानाने फडकवत सर्व अमळनेरकरांना भावनिक आवाहन केले – “आपणही आपल्या घरावर तिरंगा फडकवा, स्वातंत्र्याचा अभिमान घराघरात झळकू द्या!”

१५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला शहरात देशभक्तीची चाहूल लागली असून शाळा, महाविद्यालये, संस्था आणि सामान्य नागरिक तयारीला लागले आहेत. चौकाचौकात, घराघरात, गल्लीबोळांत त्रिरंग्याचे रंग पसरू लागले आहेत. या मोहिमेमुळे फक्त झेंडा नव्हे तर एकतेचा संदेश, बलिदानाची आठवण आणि देशासाठीची आपुलकी प्रत्येक हृदयात जागृत होत आहे.

“१५ ऑगस्टला सूर्योदयासोबत आपल्या घरावर तिरंगा झळकवून आपण भारताच्या स्वातंत्र्याचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करू!” असेही त्यांनी सांगितले.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!