राज्यपाल भगतसिंह कोश्यारीचा तांदुळवाडीत जाहीर निषेध…
प्रतिनिधी : अजिनाथ कनिचे
समर्थ नही होते तो शिवाजी नही होते. या शिवरायांची बदनामी करणारे वक्तव्य करणाऱ्या भगतसिंग कोशारी यांचा जाहीर निषेध करत मौजे तांदुळवाडी ता.माढा येथे त्यांच्या पुतळ्याचे दहन केले, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय या घोषणा देत पुतळ्याचे दहन करण्यात आले.
प्रथम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहोत, आम्ही संविधान राज्यघटना मानणारी माणसं आहोत. राज्यपाल हे एक घटनात्मक पद आहे. आम्ही त्या पदाचा सन्मान करतो. पण त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने सर्व गोष्टीचे तारतम्य बाळगून वक्तव्य करावे. कारण औरंगाबाद खंडपीठाने सर्व ऐतिहासिक पुरावे व इतिहासकारांची मते जाणून घेऊन रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. तसा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. तरी भविष्यात असं वक्तव्य करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. असा आदेश दिलेला आहे. तरी भगतसिंग कोशारी यांनी हे वक्तव्य करून समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत तरी त्यांनी समस्त शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी. आणि आपले विधान मागे घ्यावे अन्यथा त्यांच्यावर कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल. आणि असे विकृत भाष्य करणाऱ्या व्यक्तीला त्या पदावरून हटवावे यासाठी यापुढे तीव्र आंदोलन छेडले जाईल. आणि प्रसिद्धीसाठी छत्रपती घराण्याची टीका करणे बदनामी करणे हे प्रकार आता सध्या चालू आहेत. तरी भविष्यात असं कोणी पाऊल उचलले तर त्याचे तोंड काळे करून त्याला योग्य धडा शिकवला जाईल. असा इशारा समस्त शिवप्रेमी संघटना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यामार्फत देत आहे. असे प्रतिपादन शांतीलाल गवळी यांनी केले.

तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अजिनाथ परबत यांनी मासा पाणी खेळे गुरु त्याचा कोण असा संत तुकाराम महाराजांचा दाखला देत राष्ट्रमाता जिजाऊ आणि संत तुकाराम महाराज हे छत्रपतींचे गुरू आहेत. ब्राह्मणी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हे असे प्रकार चालू आहेत. त्यामुळे कोशारे यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा सर्व संघटना मिळून मोठे आंदोलन उभा करू आणि कोर्टात तक्रार दाखल करू. असा इशारा दिलेला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अजिनाथ बापू परबत, संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शांतीलाल गवळी, नागनाथ जाधव, गणेश परबत, तुकाराम गवळी, माऊली गवळी, सुमंत गवळी, अभिजीत गवळी, अभिजीत परबत, नागनाथ कदम, सोमनाथ गवळी, बाळासाहेब गवळी, विष्णू अनपट, अमोल उबाळे, आदेश परबत, मंगेश गवळी, वैभव भोसले, नागनाथ गायकवाड, हरी आबा गवळी, नरसिंह कदम, माधव गवळी, महादेव गवळी, फुलाची गवळी, हनुमंत पाटील, बार्शी तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना सुनील पाटील, सुनील माने, संदीप जाधव, राजू भाऊ गवळी, भैया घोलप, प्रशांत चव्हाण, वैभव ठोंबरे, वशिष्ठ गवळी, किरण भोसले, तुळशीदास कदम, इत्यादी शिवप्रेमी मावळे हजर होते.