स्नेहालय स्कूल मध्ये उत्साही वातावरणात बाल दिंडी साजरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी :- ज्ञानेश्वर,तुकाराम,नामदेव इत्यादी संत पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाला आपल्या सहकाऱ्यांसह निघत असत. त्यांच्या हाती ध्वज, पताका इत्यादी असायचे. या मिरवणुकीस दिंडी असे म्हणण्यात येते. कालानुरूप याचे स्वरूप बदलले आहे.आता ही दिंडी वारकऱ्यांची निघते. ते आपसात वाटेत येणाऱ्या खर्चासाठी एक ठरावीक रक्कम स्वत: गोळा करतात व आपल्या गावातून पंढरीस पायी जाण्यास निघतात. या वारीचा उद्देश आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचून विठ्ठलाचे दर्शन घेणे हा असतो.त्यातील बहुतेकांच्या खांद्यावर पताका/ध्वज असतो. कपाळास टिळा, गळ्यात तुळशीची माळ व मुखाने हरिनाम म्हणत वारीतील वारकरी दिंडी सामील होतो.

त्याचप्रमाणे स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल येथे दिंडी उत्साही वातावरणात साजरी झाली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, वारकरी, आदींची वेशभूषा केली होती. संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी व पालक यांनी विठ्ठल रुक्मिणी तसेच माऊलींच्या प्रतिमेचे पूजन केले. नंतर ‘ *ज्ञानोबा माऊली तुकाराम’,* *जय जय राम कृष्ण हरी*, हे म्हणत पालखी घेऊन दिंडी निघाली.विद्यार्थ्यानी विठ्ठल रखुमाई, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, वारकरी, आदी वेशभुषा केली होती. हातात भगवे झेंडे,टाळ, मृदंग यांच्या साथीने विठ्ठलाच्या जयघोषात वारी निघाली होती. स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी देखील यात सहभाग घेतला होता.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी,सहशिक्षिका शिवांगी कांबळे,शुभांगी खळदकर,रोहिणी गरड,पूनम परदेशी,कल्याणी परदेशी,अमृता पाटील,सुनंदा दुधे,सविता पवार,अश्विनी झाडबुके, कृष्णा पवार,असिफ मनेरी,सर्व विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!