June 28, 2025 10:06 pm

अमळनेर येथे निरंकारी भक्तांकडून 60 रक्त युनिट संकलन

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर येथे निरंकारी भक्तांकडून 60 रक्त युनिट संकलन

 

अमळनेर: विक्की जाधव.

बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत युगदृष्टा बाबा हरदेव सिंह जी यांनी सन 1986 पासून सुरू केलेली रक्तदान अभियानाची हि मोहीम आज महाअभियानाच्या रुपात आपल्या चरम उत्कर्ष बिंदूवर पोहोचली आहे. मागील 4 दशकांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 8644 शिबिरांमध्ये मिशन मार्फत 14,05,177 युनिट रक्त मानवमात्राच्या भल्यासाठी दिले गेले . संत निरंकारी मिशन मध्ये दरवर्षी 24 एप्रिल पासून महा रक्तदान शिबीरास आरंभ होत असतो. आज जवळपास संपूर्ण देशात 500 पेक्षा अधिक शाखांमध्ये जवळपास 50,000 पेक्षा अधिक रक्तदाते मानवतेच्या भल्यासाठी रक्तदान करून निस्वार्थ सेवेचे उदाहरण प्रस्तुत करतात.

दि 14 जून वार शनिवार रोजी रक्तदान शिबिर जन जागृती साठी अमळनेर शहरात विशाल मोटर सायकल रॅली चे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.…

याचाच भाग म्हणून संत निरंकारी चँरीटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा अमळनेर च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देखील धुळे झोन 36-बी अंतर्गत परम श्रध्देय श्री. हिरालाल पाटील, झोनल ईंचार्ज धुळे झोन ३६-बी यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सत्संग भवन, चोपडा रोड सिंधी कॉलनी अमळनेर येथे दि १५ जून वार रविवार सकाळी ९.00 ते ४.00 यावेळी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबीराचे उदघाटन माननीय हिरालाल पाटील जी झोनल इंचार्ज (धुळे झोन 36 B ) यांच्या सह अमळनेर परीसरातील. ग्रामीण भागातील सर्व साध संगत व स्थानिक साध संगत उपस्थित होते.

उपस्थित सामाजिक कार्यकर्ते यांनी संत निरंकारी मंडळाचे सर्व अधिकारी कार्यकर्ते मिशनच्या कार्याची प्रसंशा करत म्हणाले की मिशन आध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक उपक्रमात जसे रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, “स्वच्छ जल स्वच्छ मन”, वृक्षारोपण , नेत्र तपासणी इ. कार्यात योगदान देत आहे.

अमळनेर ब्रांच चे सेवादल इंचार्ज श्री. जितेंद्र डिंगराई यांनी आलेले अतिथींचे स्वागत व सत्कार करत संत निरंकारी मंडळाच्या वतीने आभार मानले.

यावेळी एकुण 60 रक्तयुनिट संकलन* करण्यात आले. रक्त संकलनासाठी जळगाव येथील रेडक्रॉस रक्तपेढी चे डॉक्टर्स व सर्व कर्मचारी उपस्थित होते..

या विशाल भव्य रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांसाठी चहा-पाणी, फळफळावळ, अल्पोपहार ,जेवनाची उचित व्यवस्था तसेच प्रशस्ती पत्र देण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीपणासाठी अमळनेर ब्रांच चे मुखी श्रीचंद दादा निरंकारी यांच्या सह सर्व साध संगत , सेवादल सदस्य पुरुष व महिला यांनी आयोजन नियोजनासाठी अथक परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!