June 28, 2025 9:37 pm

नवयुग शिक्षण संस्थेत नविन विद्यार्थ्याचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

नवयुग शिक्षण संस्थेत नविन विद्यार्थ्याचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालकांनी सतत शिक्षक आणि विद्यालय यांच्या संपर्कात राहाव – गुरुमुख दादा नारंग.


प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – दौंड शहरात असणाऱ्या नवयुग शिक्षण संस्थेचे स्व. लाजवंती भावनदास गॅरेला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच नवयुग प्रा. शाळा भिमनगर दौंड या विद्यालयामध्ये नव्याने प्रविष्ट झालेल्या सर्व नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व गोड खाऊ देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले. याप्रसंगी नवयुग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.गुरुमुख नारंग, सामाजिक न्याय विभाग दौंड शहर अध्यक्ष तथा संविधान संवर्धन समितीचे अध्यक्ष दीपक सोनवणे, भीमनगर परिसरामध्ये कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दौंड शहर जालिंदर सोनवणे, विद्यालयाचे प्राचार्य मा. बाळासाहेब वागसकर सर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. संदीप मांडे सर, स्थानिक स्वराज्य प्रतिनिधी सौ. प्रणोती चलवादी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी भिमनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश चलवादी यांच्या वतीने इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटपाची उद्घोषणा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालकांनी सतत शिक्षक आणि विद्यालय यांच्या संपर्कात राहावे हा मोलाचा संदेश नवयुग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुमुख नारंग यांनी उपस्थित पालक वर्गांना दिला. याप्रसंगी इयत्ता पहिली ते आठवी मध्ये प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप मान्यवर व उपस्थित पालक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पालकांमध्ये सौ. रुपाली अनिल जगताप,अर्चना बहिरट,अनिता गुजराथी, सुलताना शेख, हिना शेख, अंबादास करवर, अशोक जाधव, रमेश शिरसाठ, चंद्रकांत चितारे आदी पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षक संजय खामकर सर यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवर, पालक व विद्यार्थी यांचे आभार विद्यालयातील सहशिक्षक संजय पवार सर यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!