June 30, 2025 10:02 am

साईनाथ शिक्षण संस्थेच्या कार्याला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची कौतुकाची थाप

अपनी भाषा में पढ़े! Translate

साईनाथ शिक्षण संस्थेच्या कार्याला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची कौतुकाची थाप

(निलेश गायकवाड)

स्थानिक विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने त्यांचे भवितव्य उज्वल व्हावे यासाठी साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाने 25 वर्षांपूर्वी ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण संस्थेची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. सर्वसामान्यांच्या शिक्षणाची केंद्र असलेल्या साईनाथ शिक्षण मंडळास सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले

भिगवण येथे साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी भरणे यांच्या हस्ते विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले भरणे पुढे म्हणाले की साईनाथ शिक्षण संस्थेच्या भौतिक सुविधा मध्ये आवश्यक ती मदत केली जाईल शैक्षणिक संकुलामध्ये पेवर ब्लॉक बसवण्यासाठी वीस लाख रुपये व्यायाम शाळेसाठी आवश्यक निधी व वाचनालयासाठी 50 हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी एडवोकेट महेश देवकाते,डी. एन जगताप, प्रताप पाटील, हनुमंत बंडगर, अभिजीत तांबिले ,प्रमिलाताई जाधव ,हेमाताई माडगे ,धनाजी थोरात ,बाळासाहेब सोनवणे ,संजय खाडे ,संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत खानावरे संचालक मंडळ उपस्थित होते .डॉक्टर चंद्रकांत खानावरे यांनी प्रास्ताविक व निलेश चांदगुडे व डॉक्टर काशिनाथ सोलंकर यांनी सूत्रसंचालन तर डॉक्टर अमोल खानावरे यांनी आभार मानले कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सुचेता साळुंखे पल्लवी वाघ ,संचालक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!