बातमी विद्यार्थ्यांसाठी अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू
११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव
२२ मे २०२५ — महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत १९ मे २०२५ पासून ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केली आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे.
या प्रक्रियेअंतर्गत, विद्यार्थ्यांनी १९ मे ते २३ जून २०२५ या कालावधीत त्यांच्या शाळांमध्ये मार्गदर्शन केंद्रांवरून माहिती संकलित करून ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. २१ मे २०२५ पासून विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत तपशीलवार माहिती आणि अर्ज भरताना मदत करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
प्रवेश प्रक्रियेसंबंधी अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ व हेल्पलाइन नंबरचा (८२०८६५८५६५) वापर करावा, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचण येऊ नये यासाठी सर्व शाळा, शिक्षक व मार्गदर्शन केंद्रांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.