दौंड येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २०१ निरंकारी भक्तांचे रक्तदान!
प्रतिनिधि – विकी ओहोळ
8446119158
दौंड – रविवार, ०९ मार्च २०२५ रोजी संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिरांचे आयोजन शाखा दौंड,येथे करण्यात आले होते. यामध्ये अंदाजे २०१ संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी निस्वार्थीपणे रक्तदान केले.रक्त संकलनासाठी रुग्णालय रक्तपेढी ससून हॉस्पिटल पुणे यांनी आपले योगदान दिले.
या शिबिराचे उद्घाटन रामचंद्र केंडे जी (प्राचार्य रा.रा.पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज ) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले,शिंदे (उप प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज),फीलीप धुमाळ मा.नगराध्यक्ष वैशाली येडे हे उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले की, रक्ताला पर्याय नाही, रक्तदान हीच सर्वात मोठी मानव सेवा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी पुणे झोन मध्ये मिशनद्वारा दर महिन्याला तीन ते चार रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात, ज्यामध्ये अनेक रक्तदाते सहभागी होत असतात. हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विजय कावळे(न.पा.मुख्याधिकारी दौंड),रोहीणी शिंदे ,मयूर शिंदे,बुवा सावंत, बाबा पवार हे होते.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले.