” जी एस हायस्कुल मध्ये रथसप्तमी साजरा करण्यात आली “
अमळनेर : विक्की जाधव
खा.शि.मं.संचलित गंगाराम सखाराम हायस्कुल अमळनेर मध्ये आज रथसप्तमी निमित्ताने सुर्य देवतांचे पुजन व सुर्यमंत्र करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री बी एस पाटील सर , उपमुख्याध्यापक श्री. ए डि भदाणे सर ,पंतजली योग तंज्ञ व योग गुरु श्री.गजाजन माळी सर , जेष्ठशिक्षक के पी पाटील सर , पर्यवेक्षक श्री.एस आर शिंगाणे , , पर्यवेक्षक श्री सी एस सोनजे , शिक्षक प्रतिनीधी श्री एस पी वाघ सर, ह्यां मान्यवंराच्या शुभ हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
यावेळी योग गुरु श्री गजानन माळी सरांनी सुर्य मंत्र विद्यार्थ्यांकडून म्हणुन बारा स्टेप्स मध्ये सुर्यनमस्कार करुन घेतले.त्यानंतर योगा व सुर्यनमस्कार चे महत्व , आरोग्याचे महत्व , व्यायामाचे महत्व , सध्या भारतात होणारे आजार यांच्यावर मात करण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यायाम दररोज करावा असे मार्गदर्शन केले.
सुर्यनस्कार शरिरासाठी किती आवश्यक आहे हे सुध्दा मुख्याध्यापकांनी आपल्या मार्गदर्शन करतांना सांगितले.
यावेळी श्री.आर एन सांळुखे , श्री एस आर अहिरे सर , श्री क्रीडा विभाचे श्री, जे व्ही बाविस्कर सर ,श्री उमाकांत हिरे सर श्री एच एस चौधरी ,श्री एल सी बंजारा ,, क्रीडा विभागाचे प्रमुख व शिक्षक प्रतीनीधी श्री.एस पी वाघ सरांनी सुत्रसंचलन केले व आभार श्री जे व्ही बाविस्कर यांनी मानले.कार्यक्रम संपन्न होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृदांनी सहकार्य केले.