भिगवण हिंदू खाटीक समाज संघटनेच्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार
(निलेश गायकवाड)
शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या त्यांच्या यशाच्या शाबासकीची थाप म्हणून विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जय मल्हार तरुण मंडळ व भिगवण हिंदू खाटीक समाज संघटनेच्या वतीने सत्कार सोहळा घेण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर जेष्ठ सामाजिक नेते लाला धवडे, भिगवण ग्रामपंचायत सदस्य सचिन बोगावत,सिमा काळंगे, मेघना शेलार, कमलेश गांधी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यामध्ये तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत राज युवराज गायकवाड प्रथम क्रमांक 44 किलो वजन गट तसेच यश शिवाजी वायसे द्वितीय क्रमांक 28 किलो वजन गट
* सिंहगड पुणे येथे कराटे चॅम्पियन स्पर्धा यशराज तुकाराम धावडे द्वितीय क्रमांक, प्रिन्स सचिन खडके तृतीय क्रमांक, इंदापूर तालुका प्रथम क्रमांक शाईदी मुलानी
•डॉ गौरी महेश ताटे हिने बालरोग एमडी पदवी संपादन केल्यामुळे सन्मानित करण्यात आले
* मनीषा शिवाजी गुंजाळ फूड सेफ्टी ऑफिसर पदी नियुक्ती झाल्यामुळे
* साक्षी सुनील शेलार Bams पदी संपादन केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले
* मोहित महेंद्र बोगावत mba फायनान्स मार्केटिंग पदवी संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी मेघना शेलार यांनी बोलताना सांगितले गुणवत्तापूर्ण शिक्षणातही येथील विद्यार्थ्यांनी यशाचा कळस गाठला आहे. कष्टाची तयारी असली आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर येथील उज्ज्वल यश संपादन करू शकतात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जमदाडे यांनी बोलताना सांगितले जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. तसेच कार्यक्रमाचे आभार सचिन खडके यांनी मानले.
कार्यक्रमाचे संयोजक .
राजेंद्र जमदाडे. राजेंद्र जांभळे. रोहित ताडे.. सचिन भैय्या खडके. गणेश कांबळे. प्रशांत कांबळे..आकाश कांबळे.गणेश खडके.सचिन थोरपे. गिरीश घोडके. अशोक कांबळे.तुषार कांबळे. सागर कांबळे.सौरभ जमदाडे केतन कांबळे , साहिल ताडे,दत्ता कांबळे,अजय कोथमिरे, बबलु कांबळे,आदित्य थोरपे आदिजन.तसेच कार्यक्रमाला ग्रामस्थां व महिला, युवक सामाजिक कार्यकर्ते आदिजन उपस्थित होते