३४ वर्षांच्या परप्रांतीय पिडीतेवर बळजबरीने शारीरिक संबंध करणाऱ्या नराध्यमास माळेगाव पोलिसांनी केली अटक…
बारामती (सह – संपादक – संदिप आढाव)
कामाचे आमिष दाखवून परप्रांतीय पिंडीते सोबत ५-६ वेळा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या २५ वर्षीय युवकावर माळेगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील घटनेने संपूर्ण बारामती तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पणदरे ता.बारामती येथे दि.३ ते १० जानेवारी दरम्यान घडली.
पोपट धनसिंग खामगळ रा.खामगळवाडी ता.बारामती जि . पुणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्यांच्या विरोधात ३४ वर्षांच्या परप्रांतीय पिडीतीने फिर्याद दिली आहे.
आरोपीने संबंधित पिडीतीलाकामाचे आमिष दाखवून आरोपीच्या हॉटेल बांधकाम सुरू असलेल्या खोलीत ५-६ वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले असून घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर करत आहेत.