June 29, 2025 3:04 am

प्रताप’ मध्ये जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन साजरा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप’ मध्ये जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन साजरा..

 

अमळनेर : विक्की जाधव 

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) या ठिकाणी आज 18 डिसेंबर हा दिवस  जागतिक अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा करण्या संदर्भात शासनाचे आदेश पत्राद्वारे निर्गमित झाले.खरे पाहता संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक स्तरावर अल्पसंख्याक समुदायासाठी 1992 मध्ये घोषणपत्रात अल्पसंख्याक हक्क संबंधी तरतूद केली आहे. तेव्हापासून जगभर अल्पसंख्यांकांचे हक्क यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आबाधित ठेवण्याचा एक उपक्रम म्हणून अशा पद्धतीच्या दिवसाचे  औचित्य साधून विविध कार्यक्रमाच्या द्वारे हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन संदर्भात रुक्मिणीताई पाटील कला व विज्ञान महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ.एस जे शेख हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

त्यांनी आपल्या भाषणात अल्पसंख्यांक नेमके कोण आहेत ? भाषिक व धार्मिक प्रकारच्या अल्पसंख्याक समुदायाची तरतूद कशा प्रकारची आहे ? त्याचे विस्तृत वर्गीकरण करून भारतीय संविधानातील अनुच्छेद क्रमांक 25 ते 28 याचप्रमाणे अनुच्छेद क्रमांक 29 व 30 यामध्ये अल्पसंख्याकांच्या हक्का संदर्भात असणाऱ्या तरतुदींचा या ठिकाणी उहापोह केला.अल्पसंख्यांक समुदायाला शासनाच्या सवलती व योजना कोणत्या आहेत ? आणि त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येतील ? यासंदर्भात मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात पुढे असे सांगितले की, मौलाना आझाद विकास महामंडळ व फाउंडेशन,दिल्ली यांच्यामार्फत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिले जातात. भारतीय संविधानात या वर्गासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक तरतुदी आढळतात तसेच उच्च शिक्षणात अल्पसंख्याक समुदायाची संख्या जरी कमी असली तरी त्यांना हक्कापासून वंचित ठेवणे योग्य नाही म्हणून त्यांना अधिकाधिक हक्क, योजना व सवलती कशा मिळतील या पद्धतीचे प्रयत्न सर्वांनी करावे असे आवाहन केले.

प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शि.मंडळाचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ.अरुण जैन होते.त्यांनी देखील जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन महत्त्वाचे असून या संदर्भात जाणीव व जागरूकता अधिकाधिक व्हावे, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शासनाच्या योजना व सवलतींचा लाभ मिळावा या पद्धतीचे प्रतिपादन केले.

या समारंभाचे प्रास्ताविक प्रा.अवित पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभाराचे कार्य इतिहास विभाग प्रमुख डॉ.धनंजय चौधरी यांनी पार पाडले.

याप्रसंगी व्यासपीठावर अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षेच प्रमुख डॉ.मुकेश भोळे, खान्देश शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ.धीरज वैष्णव,महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.पराग पाटील,डॉ.विजय तुंटे,डॉ.कल्पना पाटील,डॉ.व्ही बी मांटे, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. जयंत पटवर्धन यांच्यासह अनेक प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!